Wardha Murder News
वर्धा: देवळीत दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाचा खून करण्यात आला. File Photo
वर्धा

देवळी येथे दारूसाठी पैसे न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

वर्धा: पुढारी वृत्तसेवा: देवळी येथे दिवसाढवळ्या एकाची दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. २४) घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. विनोद डोमाजी भरणे (वय ४५, रा. सोनेगाव (आबाजी) असे मृताचे नाव आहे. करण कैलास मोहिते असे संशयित आरोपीचे नाव आहे.

नेमका खून कसा झाला?

  • करण मोहितेने विनोद भरणे यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले.

  • विनोद भरणे यांनी पैसे देण्यास नकार

  • त्यामुळे करण याने विनोद यांच्या डोक्यावर दगड मारला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनेगाव येथील विनोद डोमाजी भरणे हे काही कामाकरिता देवळी येथे आले होते. काम आटोपल्यावर गावी परत जाण्याकरीता पोलिस वसाहतीसमोरील चौकात ऑटोची वाट बघत उभे होते. दरम्यान, करण मोहिते याने विनोद भरणे यांना दारू पिण्याकरिता पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर विनोद हे पायदळ गावाकडे निघाले असता करण मोहिते याने मागाहून जाऊन विनोद यांच्या डोक्यावर मोठा दगड मारला.

विनोद भरणे जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या डोक्यावर करण मोहिते याने क्रूरपणे दगड टाकले. त्यामुळे विनोद जागीच ठार झाले. याप्रकरणी करण कैलास मोहिते यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

SCROLL FOR NEXT