वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे तळेगाव मार्गाने आर्वीकडे येणाऱ्या प्रवासी ऑटोला एका वाहनाच्या चालकाने कट दिल्याने ऑटो अनियंत्रित होवून अपघात घडला. हा अपघात आज १७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडला. या अपघातात तीन प्रवासी गंभीररित्या तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ऑटो चालक हा तळेगाव मार्गाने प्रवासी घेवून आर्वी कडे येत होता. आर्वी येथे अचानक अज्ञात वाहन चालकाने डॉक्टर कॉलनीकडून येवून ऑटोला कट दिली. यात ऑटो अनियंत्रित झाला आणि सुरुवातीला झाडाला धडक दिली. त्यानंतर लगतच्या नाल्यात गेला. यात ऑटो चालकासह तीन जण गंभीररीत्या जखमी झाले. चार जणांना किरकोळ इजा झाली. जखमींना पुढील उपचाराकरिता अमरावती येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. फिर्यादी वरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार नीरज लोही करीत आहे.