प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
वर्धा

वर्धा : अज्ञात चोरट्यांनी केला ७० हजारांचा ऐवज लंपास

हिंगणघाट येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातून ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ८ मार्च रोजी हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्ड परिसरात ही घटना घडली.

हिंगणघाट येथील शिवालय नगर संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील रमेशराव जिलपे (वय ५०) घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराचा कुलूपकोंडा तुटलेला दिसला. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख दहा हजार रुपये असा ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT