वर्धा : महसूल विभागाच्या अनधिकृत गौण खनिज वाहतूक कारवाईत ट्रॅक्टर जप्त File Photo
वर्धा

वर्धा : महसूल विभागाच्या अनधिकृत गौण खनिज वाहतूक कारवाईत ट्रॅक्टर जप्त

Tractor seized: वाहनावर नियमानुसार दंडात्मक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : गौण खनिज वाहतूक करण्याकरिता विहित परवानगी न घेता अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणारे वाहनावर कार्यवाही करण्याकरिता तहसील कार्यालयाचे पथक कार्यरत आहे. १२ व १३ जानेवारी रोजी सदर पथक गस्त करीत असताना आर्वी व रोहणा येथे अनधिकृत वाळू वाहतूक करत असताना ट्रॅकटर आढळून आले.

हे वाहन जप्त करून वाहनावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई जिल्हाधिकारी वान्मथी सी., उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार हरीश काळे, नायब तहसीलदार देविदास सोरटे, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT