रस्त्यावर अडवून लुटमारी; चौघांना अटक 
वर्धा

Wardha crime : रस्त्यावर अडवून लुटमारी; चौघांना अटक

संशयितांकडून पाच गुन्हे उघडकीस, सहा दिवस पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : देवळी ते वडद आणि पालोती रस्त्यावर अडवून लुटमार करत दहशत पसरविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.१३) सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. प्रज्वल विनोद ठाकरे (वय २२) रा. सावंगी (मेघे), तारासिंग जग्गासिंग बावरी (रा.सावंगी (मेघे), संकल्प प्रेमदास शेंदरे (रा. तिगाव आमला), आकाश दिलीप ओंकार (रा. आमला) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सालोड मार्गावरील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती.तसेच नागठाणा रोडवरील लोखंडी रेल्वे पुलाजवळ मोटरसायकलने जात असलेल्या व्यक्तीजवळून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन व पैसे हिसकावले होते. याबाबत तक्रारीवरून सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना एका बंद घरी चोरीचे घरगुती साहित्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जावून प्रज्वल विनोद ठाकरे (वय २२) रा. सावंगी (मेघे), वर्धा यास ताब्यात घेवून घराची पाहणी केली. घरात गुन्ह्यातील चोरी गेलेले साहित्य मिळून आले.

प्रज्ज्वल ठाकरे याची विचारपूस केली असता, काही दिवसांपूर्वी सावंगी ते सालोड रोडवरील एका बंद घराचे दार तोडून तेथून तारासिंग बावरी, संकल्प शेंदरे, आकाश ओंकार, या तिघांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती त्याने दिली. ते साहित्य सावंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले साहित्य असल्याचे निष्पन्न झाले. प्रज्वल ठाकरेच्या झडतीत मोबाईल मिळून आला. हा मोबाईल रस्त्यावर लुटमार केलेल्या प्रकरणातील व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता एम.आय.डी.सी. देवळी येथे काम करणाऱ्या कामगारांना अडवून त्यांच्याकडून दागिने,मोबाईल, पाकिटमारी केल्याची माहिती त्यांनी दिली. चोरट्यांकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असून त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ठाणेदार संदीप कापडे यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, अमोल जाधव, सायबर सेल वर्धा येथील अक्षय राउत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT