File Photo
वर्धा

वर्धा : जुगारवर छापा, २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

Wardha News | स्‍थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : हिंगणघाट येथे जुगार कायद्यान्वाये छापा टाकून २ लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई केली.

हिंगणघाट शहरातील आठवडी बाजार, दुकान लाईन, रायसोनी मॉलचे मागे गेम पार्लरच्या माध्यमातून जुगार सुरु होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच व्हिडिओ गेम पार्लरवर छापा टाकण्यात आला. यावेळी व्हिडिओ गेम पार्लरमधील दोन लाख रुपये किमतीच्या १० इलेक्ट्रॉनिक मशिन, ९ प्लास्‍टिक स्टूल, ६,३५० रूपये, तसेच मोबाईल असा २ लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी सुरेश किसन गायकवाड (वय ३७), रा. गौतम वॉर्ड, मनोज सुर्यभान येरमे (वय ४०), रा. वीर भगतसिंग वॉर्ड, गोविंद करमचंद सौदे (वय ३२), रा. स्विपर कॉलनी, रविंद्र विठ्ठलराव हुर्स्ले (वय ३८), रा. डांगरी वॉर्ड, ताज खान मुन्नवर खान (वय ३३) रा. निशानपुरा वॉर्ड हिंगणघाट यांस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रकाश लसुंते, नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, नितीन इटकरे, सागर भोसले यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT