वर्धा : वाळूची विना परवाना चोरटी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाने केली.
हिंगणघाट तालुक्यातील लाडकी नदीच्या पात्रातील घाटातून वाळू चोरी करून बुरकोणी कडे वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनि ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता वाळू साठा आढळला. पोलिसांनी पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली वाळू असा 8,08,000 रुपयांचा मुद्देमाला जप्त केला. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, सुशीलकुमार नाय यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार सतीश घवघवे , पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.