Illegal Fertilizer Stock Pudhari
वर्धा

Illegal Fertilizer Stock Wardha | अनधिकृतपणे घरात ठेवलेला खताचा साठा जप्त 

देवळी तालुक्यातील नाचणगाव, इंझाळा येथे अनधिकृतरित्या ठेवलेला सात लाखांचा खताचा साठा जप्त करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Deoli Taluka Illegal Fertilizer Stock

वर्धा : देवळी तालुक्यातील नाचणगाव, इंझाळा येथे अनधिकृतरित्या ठेवलेला सात लाख रुपयांचा खताचा साठा जप्त करण्यात आला. कृषि विभागाच्या जिल्हा स्तरावरील भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. 

जिल्हास्तरावरील भरारी पथकाच्या माध्यमातून प्राप्त माहितीच्या आधारे नाचणगाव येथे तपासणी करण्यात आली. सदर तपासणी वेळी एका राहत्या घरी अनधिकृतपणे खत साठा भरारी पथकास आढळून आला. सदर खत साठा हा एका कृषि सेवा केंद्राचा असल्याचे निदर्शनास आले. परंतु खत साठा करण्यासाठी सदर कृषि सेवा केंद्राने परवानगी घेतली नसल्याचे तपासणी पथकास आढळून आले.

सदर गोदामात विविध प्रकारचे खत आढळून आले. या खताची अंदाजित रक्कम सात लाख रुपये इतकी दिसून असल्याचे सांगण्यात आले. खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार सदर खतांच्या गोण्यांवर नियमानुसार आवश्यक तो मजकूर छापला नसणे, सर्व खतांच्या गोण्यांवर एकच बॅच क्रमांक व एकच महिन्याचे निर्मिती असल्याचे दिसून आले. खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतूदी नुसार भरारी पथकाने सदर खत साठ्यास विक्री बंद आदेश दिला असून सर्व खतांचे नमुने प्रयोगशाळेस पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रयोगशाळेतून विश्लेषण अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले. 

तपासणीवेळी भरारी पथक प्रमुख जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी संदीप ढोणे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रमोद पेटकर, गुणनियंत्रण निरीक्षक राजेश अंबुलकर, कृषि अधिकारी गुण नियंत्रण निरीक्षक तालुका कृषि अधिकारी देवळी महेश पालवे, पुलगाव येथील मंडळ अधिकारी रितेश करोडे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT