Accident file photo
वर्धा

Wardha Accident |वर्ध्याच्या हिंगणघाट महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पती-पत्नी आणि सहा वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू, भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : वर्ध्याच्या हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर हॉटेल तनवीर सगुना फॅक्टरीजवळ झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पती, पत्नी आणि सहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वानखेडे कुटुंब मोपेडने हिंगणघाटकडे येत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट 112 पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. या हृदयद्रावक घटनेमुळे समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT