Hinganghat Taluka
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा ते सोनेगावदरम्यान वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. शुक्रवारी (दि. २६) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
भिवापूर येथील तीन जण दुचाकीवरून नियोजित ठिकाणी जात होते. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे धोत्रा ते सोनेगावदरम्यान थांबले असता झाडावर वीज कोसळली. त्यात अनिल ठाकरे व सौरभ ठाकरे यांचा मृत्यू झाला. वेदांत ठाकरे हा जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने भिवापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.