वर्धा : पुलगाव येथे लाकडाच्या दुकानांना आग लागली. यामध्ये लाकूड जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही आगीची घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव शहरात असलेल्या लाकूड विक्रीच्या तीन दुकानांना रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.
याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग नियंत्रणात आणण्यासाठी पुलगाव, देवळी व आर्वी येथील अग्निशमन दलाला सुध्दा पाचारण करण्यात आले. जवळपास तीन ते चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत लाकूड, बांबू बास, बल्ली, चटई आदी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये तीनही मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. या घटनेत सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे कारण कळू शकले नाही. घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली.