Local Body Elections Wardha
वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी अध्यक्ष पदासाठी १३ तर सदस्य पदासाठी २३७ नामांकनपत्र दाखल झाले.
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे या सहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रविवार १६ नोव्हेंबर रोजी वर्धा नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी ६० नामांकनपत्र, हिंगणघाट नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी ८३ नामांकनपत्र, आर्वी नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी २१ नामांकनपत्र, देवळी नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी २२ नामांकन, पुलगाव नगर परिषद सदस्य पदासाठी ४३ नामांकनपत्र, सिंदी रेल्वे नगर परिषद सदस्य पदासाठी ८ नामांकनपत्र दाखल झाले. यामध्ये काही नगरपरिषदांमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केलेले आहे.
तसेच हिंगणघाट नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ३ नामांकनपत्र, पुलगाव नगर परिषद अध्यक्ष पदासाठी ४ नामांकनपत्र, वर्धा नगर परिषद अध्यक्ष पदासाठी ४ नामांकन, देवळी नगर परिषद अध्यक्ष पदासाठी २ नामांकन, असे एकुण १३ नामांकनपत्र दाखल झाले आहे, असे सांगण्यात आले. सोमवार 17 नोव्हेंबर हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्र दाखल होण्याची शक्यता आहे.