Railway  Pudhari
वर्धा

Central Railway Nagpur | मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे मार्गांच्या कामांना गती

रेल्वे पायाभूत सुविधा बळकटीकरणासह रेल्वे परिचालनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Division Third And Fourth Railway Line

वर्धा : मध्य रेल्वेचा नागपूर विभाग रेल्वे मार्गांची क्षमता वाढविणे, रेल्वे गाड्यांचे सुरळीत परिचालन सुनिश्चित करणे तसेच प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे मार्गांच्या विविध प्रकल्पांवर काम करीत आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होण्यासोबतच रेल्वे परिचालनाची कार्यक्षमताही वाढण्यास मदत होणार आहे.

वर्धा – नागपूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग प्रकल्प प्रत्येकी ७८.७ किलोमीटरचा आहे. वर्धा–नागपूर तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत सेवाग्राम–अजनी या ६१.५५ किलोमीटर लांबीच्या विभागातील तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित अजनी–नागपूर आणि सेवाग्राम–वर्धा या विभागांमध्ये काम सुरू आहे. यासोबतच सेवाग्राम येथे रेल्वे फ्लायओव्हरच्या बांधकामाचे कामही प्रगतीपथावर आहे.

भुसावळ–बडनेरा–वर्धा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग प्रकल्प हा प्रत्येकी ३१४ किलोमीटरचा आहे. भुसावळ–बडनेरा–वर्धा तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास ऑगस्ट २०२५ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून निविदा प्रक्रियेच्या नियोजनाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत बडनेरा–वर्धा विभागातील बांधकामाचे काम मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT