वर्धा : प्रयागराजहून बिदर येथे जाणार्या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सला नागपूर-तुळजापूर मार्गावरील वर्ध्यालगतच्या नागठाणा शिवारात ट्रकने धडक दिली. या अपघातात १५ जण जखमी झाले. जखमींना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) सकाळच्या सुमारास घडली.
प्रयागराज येथून भाविक कनार्टकच्या बिदर येथे मिनी ट्रॅव्हल्सने परत जात होते. दरम्यान, नागपूरकडून यवतमाळकडे जाताना वर्ध्यालगत नागठाणा शिवारात आज (मंगळवारी) सकाळच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणार्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली. यामध्ये १५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत पंचनामा केला. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.