वर्धा : शहरानजीकच्या पिपरी (मेघे) परिसरातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास जेवणानंतर अचानक बिघडली. विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास झाला. त्यामुळे तातडीने विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अन्नातून विषबाधेचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात येते.
बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील काही विदयार्थ्यांना रविवारी रात्रीच्या सुमारास जेवण केल्यानंतर त्रास होऊ लागला. काहींना उलट्या, मळमळ, पोटदुखी आदी त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.