Samruddhi Expressway Accident Pudhari
वर्धा

Wardha Accident : सात भाविकांच्या मृत्यूने शोककळा! पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी घेतली जखमीची भेट

देवीची मूर्ती आणताना समृध्दी महामार्गावर झाला भीषण अपघात! 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री झाला अपघात

पुढारी वृत्तसेवा

वर्धा :  शेगाव येथून वर्धेला दुर्गादेवीची मूर्ती घेऊन येत असताना ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू  झाला. या घटनेत १९ जण जखमी झालेत. धामणगाव (रेल्वे) ते पुलगावदरम्यान समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. जखमींवर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शोकळा पसरली आहे

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेत विचारपूस केली. वर्ध्याच्या सिंदी (मेघे) येथील सोमनाथे ले आऊटमधील युवा नवदुर्गा पूजा उत्सव समितीकडून शेगाव येथून दुर्गा मातेची मूर्ती आणण्यात येत होती. १ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर धामगणाव (रेल्वे) ते पुलगावदरम्यान मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला.

पाच जणांचा जागीच तर दोन जणांचा सावंगी (मेघे ) येथील रुग्णालयात येत असताना मृत्यू झाला. दुर्घटनेत घनश्याम पाटील, प्रवीण बकाणे, गोलू उर्फ सचिन  बादलमवार, ओम गावंडे, दत्ताजी कुरसंगे यांचा जागीच तर रोशन राऊत, मुनेश्वर ढोले यांचा सावंगी (मेघे) रुग्णालयात  उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

एकास नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र शोककळा  पसरली - अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सावंगी (मेघे) रुग्णालय गाठून जखमींची माहिती घेतली. जखमींची विचारपूस करत धीर दिला.  अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजसिंह पवार, सावंगी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, राजेश सव्वालाखे यांनी रुग्णांची भेट घेत चौकशी करून रुग्णांची विचारपूस केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT