Vardha Revenue staff demand
वर्धा : महसूल सेवकांना चुतर्थ श्रेणीत समावेशित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरात महसूल सेवक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. मागणीची पूर्तता न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण व्हावी म्हणून गाव स्तरावर महसूल सेवक नेहमीच हजर असतात. रात्र दिवस काम करणारे महसूल सेवक अल्पशा मानधनावर काम करतात. त्यात परिवाराची उपजीविका पूर्ण होत नाही. महसूल विभागात काम करताना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करावा म्हणून संघटना कित्येक दिवसापासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करावा, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. वर्धा, आर्वी, आष्टी, देवळी आदी ठिकाणी तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.