Maharashtra Police Pudhari News Network
वर्धा

दोन अधिकारी, चार अंमलदारांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर 

Maharashtra police news | पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या पोलीस अधिकारी व अंमलदारांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून दरवर्षी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. सन २०२५ या वर्षासाठी जाहीर झालेल्या या अत्यंत मानाच्या 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' पदकांमध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलातील २ पोलिस अधिकारी ४ अंमलदारांनी आपले नाव कोरले आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार, वर्धा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकारी, चार अमलदारांना सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये तळेगाव (श्या.पंत) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, जाम महामार्ग पोलिस केंद्राचे भारत पिसुडे, सायबर पोलिस स्टेशनचे दिनेश बोथकर, देवळी पोलिस स्टेशनचे सतीश दरवरे, महिला पोलिस शिपाई सुनैना डोंगरे यांचा समावेश आहे.

या अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन आणि क्लिष्ट तांत्रिक तपास क्षेत्र तसेच खेळाच्या क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले. १ मे रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT