वर्धाः माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वर्धा जिल्ह्यातील वायफड येथे भेट दिली होती. त्यांच्या आठवणींना वायफडवासीयांनी उजाळा दिला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वायफड येथे भेट दिली. जवळपास तासभराच्या दौऱ्यात त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते.
शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील डोरली येथे गाव विकणे आहे, हे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाने देशाचे लक्ष वेधले. शेतकरी आत्महत्या शेतकर्यांच्या समस्या देशाच्या पटलावर उमटल्या. वायफड येथे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ३० जून २००६ रोजी भेट दिली. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, सुशिलकुमार शिंदे, वसंतराव पुरके, प्रमोद शेंडे, मार्गारेट अल्वा, केंद्रीय नियोजन समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. जवळपास एक तास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग वायफड येथे होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रश्न ऐकून घेतले. माहिती जाणून घेतली. वायफड येथील दौर्यानंतर धोरणात्मक निर्णयासह हमी दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतल्या गेला.
३० जून २००६ रोजी डॉ. मनमोहन सिंग वायफड येथे आले होते. डॉ. मनमोहन सिंग येथे आले. एक तास आमच्या बरोबर होते. मुक्त अर्थ व्यवस्था आणि नवीन आर्थिक धोरण यामुळे गाव आणि शहर यातील अंतर वाढत आहे. त्यामुळे गावातील आत्महत्या वाढत आहे, हे त्यांना माहीत होते. पण ते आले, त्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी दुरुस्ती करणारे धोरणात्मक निर्णय घेतले. देशातील शेतकर्यांची ७० हजार कोटींची कर्जमाफी केली. राष्ट्रीय मनरेगाची घोषणा केली. २८ ते ५० टक्के एमएसपी वाढवली. मनमोहन सिंग यांनी दाखवलेलं औदार्य त्या दिशेने जावून माणसाला माणसासारखं जगण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्य करणे हिच डॉ. मनमोहन सिंग यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी संवेदना शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग वायफड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी शेती आणि उद्योग ही अर्थव्यवस्थेची दोन चाके असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकर्यांकरिता पॅकेज दिले. कर्जमाफी दिली. एमएसपीत घसघशीत मोठी वाढ त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांनी शेतकर्यांच्या उत्थानासाठी काम केलं, अशा संवेदना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी व्यक्त केल्या.