Tiger Attack Farmer killed Pudhari
वर्धा

Wardha Tiger Attack | नरसिंगपूर शिवारात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी शहरातील कवठीपुरा येथील मृत वृद्ध शेतकरी

पुढारी वृत्तसेवा

Narsingpur Farmer Killed By Tiger

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नरसिंगपूर शिवारात शेतात गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आष्टी शहरातील कवठीपुरा येथील शेतकरी रामभाऊ भोयर (वय ७० ) नागपंचमीच्या निमित्ताने शेतात पूजा करण्यासाठी गेले होते. दरम्यान वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.

घटनेची माहिती वनविभागाला देताच वनविभागाच्या तळेगाव वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्रधिकारी गजानन लांबाडे, आष्टीच्या वनपरीक्षेत्रधिकारी पूनम ब्राम्हणे, वनपाल रोहिणी पडोळे, वनरक्षक इन्द्रपाल भगत, ठाणेदार राजेश जोशी, पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगरळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी नोंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT