बीसीजी लसीकरण  Pudhari Photo
वर्धा

वर्धा जिल्ह्यातील ८३ हजार प्रौढांचे बीसीजी लसीकरण होणार

पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हातील १८ वर्षावरील ६ निकषामधील पात्र ८३७४८ नागरिकांचे बिसिजी लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता गुरुवार (दि.५) जूनपासुन बीसीजी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बीसीजी लस ही लहान मुलांप्रमाणे प्रौढासाठीही उपयुक्त ठरत आहे. इतर आजाराविरोधातही लस परिणामकारक ठरल्याचे संशोधनातुन सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील ८३७४८ लाभार्थीनी लस घेण्यासाठी संमती दिली असून "टीबी-वीन" पोर्टलवर नोदंणी करण्यात आली असुन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

प्रभावी अमलबजावणीसाठी सर्व खाजगी, सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर यांनी केले आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तरावरुन कर्मच्याऱ्यानां मार्गदर्शन केले आहे.यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आलेली असुन तालुकास्तरावर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी केले आहे.

बीसीजी ही लस १८ वर्षावरील व्यक्ती ६ पैकी कोणतेही १ किंवा अनेक निकष असलेली व लस घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीस देण्यात येईल. यामध्ये ६० वर्षावरील वय असलेली व्यक्ती, बीएमआय १८ पेक्षा कमी असणे, मधुमेही व्यक्ती, स्वयमघोषित सध्या किंवा पुर्वी धुम्रपान करणारे व्यक्ती, जानेवारी २०२१ पासुन सक्रिय टीबी रुग्णाच्या संपर्कात असणारे जवळील सहवासीत, मागील ५ वर्षात टीबी झालेल्या व्यक्ती असे निकष आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT