वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जैतापूर शिवारात गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून २९ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील जैतापूर शिवारात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यादरम्यान शेतशिवारात चरण्यास गेलेल्या शेळ्यांना वीज कोसळल्याने विजेचा धक्का बसला. यात २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तहसिलदार, बीट अंमलदार आणि तालुका पशुधन विकास अधिकारी यांना देण्यात आली. यावेळी शेळ्यांची देखभाल करणारे दोघे थोडक्यात बचावले. तलाठी, ग्रामसेवक यांनी स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंचनामा करून तहसिल कार्यालयात अहवाल सादर केला. यात शेळी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाने तातडीने नुकसान भरपाई मंजुर करावी, अशी मागणी होत आहे.