विदर्भ

चंद्रपूर : जंगली डुकराच्या धडकेत पोलिसाचा अपघाती मृत्यू

अमृता चौगुले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जंगली डुकराने धडक दिल्याने एका पोलिस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) सांयकाळी पोंभूर्णा मार्गावरील अंधारी नदीजवळ घडली. विकास गणपत खडके असे मृतक पोलिसाचे नाव आहे. ते पोभूर्णा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते.

शुक्रवारी सायंकाळी पोलिस ठाण्यातील डयुटी टपाल घेवून मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विकास खडके आले होते. टपाल देवून पोंभूर्णा येथे मोटार सायकलने परत जात असताना सुशी दाबगाव गावाच्या पुढे अंधारी नदीजवळ जंगली डुकराने मोटार खडके यांच्या सायकलला धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील त्यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ते मोटारसायकल सहित रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात खडके यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT