विदर्भ

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जोपासावा : हंसराज अहिर

backup backup
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य निर्माण करण्यात बारा बलुतेदारासह विविध जाती-धर्मातील लोकांचा सहभाग घेतला. स्वराज्य रक्षणार्थं अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे हौतात्म्य, बलिदान, त्याग, समर्पण इत्यादी चिरकाल स्मरणात राहावे व नवीन पिढीने हा आदर्श समोर ठेवून स्वाभीमानाने जीवन जगावे आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा इतर मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केले. राजुरा येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष ऍड. संजय धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, अविनाश जाधव,सुधीर धोटे, संजय पावडे, खुशाल बोन्डे, सरपंच नंदकिशोर वाढई, सुरेश केंद्रे, महेश देवकते, निलेश ताजणे, सतीश उपलंचिवार, राधेश्याम अडानिया, आशिष करमरकर, स्वप्नील मोहुर्ले, आदींची उपस्थिती होती.
हंसराज अहिर पुढे म्हणाले, श्री हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजांनी जुलमी, अत्याचारी व अन्यायी सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील विश्वासू मावळ्यांना एकत्र करून जगाच्या इतिहासात न्यायाचे, सत्याचे, स्त्री सन्मानाचे, समता व बंधुत्वाचे वातावरण असणारे हिंदवी स्वराज्य निर्माण केले.
यावेळी नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, टिफिन बॉक्स, तुळीचे बियाने पॉकेट भेट देऊन सत्कार करण्यात आला. अठरा पगड जातीतील जातीय आधारित व्यवसाय करणारे व वेगवेगळ्या जाती समाजाचे प्रमुख,  समाजातील सामाजिक कर्तव्य पार पाडणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, समाजकार्यात युवा सहभाग यांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेतील यश प्राप्त विद्यार्थी, बारावीतील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी,  शेतकाम, शेतमजुरी, करणाऱ्या शंभर कष्टकरी महिलांचा साडीचोळी, भाजीपाला बियाने देऊन सत्कार करण्यात आला. ऍड. यादवराव धोटे महाविद्यालय च्या विध्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, सईबाई, मावळेची वेशभूषा  परिधान करून उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले. जीवती तालुक्यातील येल्लापूर निवासी सांभाजी ढगे यांनी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्यगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन बादल बेले, महासचिव, शिवराज्यभिषेक सोहळा समिती, डॉ. दिनेश दुर्योधन यांनी केले. प्रास्ताविक अविनाश जाधव, स्वागताध्यक्ष यांनी तर आभार प्रा. इर्शाद शेख यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT