विदर्भ

गडचिरोली: कोरची येथील आश्रम शाळेतील ९ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

अविनाश सुतार

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कोरची येथील शासकीय आश्रम शाळेतील ९ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली. त्यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरची येथील शासकीय आश्रमशाळेत ४२३ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात २२५ मुलींचा समावेश आहे. १९८ विद्यार्थी वसतिगृहात राहतात. या विद्यार्थ्यापैकी ३ मुलींना रविवारी रात्री उलट्या होऊ लागल्या. त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी ५ मुली आणि एका मुलामध्ये पुन्हा तीच लक्षणे आढळून आल्याने त्यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले. डॉ. आशिष इटनकर हे विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बरी असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय थूल यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सहायक प्रकल्प अधिकारी नीलय राठोड यांनी आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT