File Photo  
विदर्भ

नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, ठिकठिकाणी झाडे पडली

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये आज (दि. ३) विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे कुठे भिंत पडली, कुठे वाहनांवर झाड पडल्याने नुकसान झाले. खूप दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाडा होता. कुलर, पंखे गारवा देईनासे झाले होते. पिके चांगली असली तरी ऑक्टोबर हिट सारखे वातावरण झाल्याने शेतीचे नुकसान होत होते परंतु आज अचानक पावसाने पुनरागमन केल्यावे शेतकरी बांधव काहीसा आनंदी झाला.अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कमी पडल्यामुळे वातावरणात खूप फरक पडला होता. डेंग्यूने आरोग्य विभागाची चिंता वाढविली होती. नागपूर शहरात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यामुळे नागरिकांना त्रास झाला. बजाज नगर येथे झाड पडले. वाहतूक खोळंबली अखेर झाड रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. शुक्रवारी रोड शिवाजी पुतळा, अशोक चौक मार्गावर झाड पडल्याने एक रस्ता बंद झाला. वीज आणि केबल वायर तुटल्याने काही झाडे मनपा, अग्निशामक दल चमूला कापावी लागली.

तिरंगा चौक येथील चांदनी बार व यश फनिऀचर माटऀ येथे झाडाखाली दबलेली कार,व मोटारसायकल बाहेर काढण्यात आली.उज्वल नगर येथील अभय भट व अशोक जोशी यांच्या घरावर पडलेले मोठे आंब्याचे झाड कापून मार्ग मोकळा करण्यात आला

दरम्यान, सम्यक बुद्ध विहार नरेंद्र नगर येथील रोडवर झाड पडले ते कापून रस्ता मोकळा करण्यात आला. डॉ.बबनराव चौधरी प्लॉट न 101 विठोबा अपार्टमेंट स्वावलंबी 'नगर येथे गाडी क्र mh -31-FO -9274 या कारवर पडलेले झाड कापण्यात आले. लकडगंज स्टेशन, सक्करदरा पोलीस स्टेशन जवळ रोडवर असलेले पडलेले झाड बाजूला करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT