विदर्भ

नागपूर जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमृता चौगुले
नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारतीय नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत नागपूर शहरात व जिल्हयात नागरिकांनी मोठया संख्येने तिरंगा १५ ऑगस्टपर्यंत उभारावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याची स्मृती तेवत राहावी, जनतेच्या मनातील स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत राहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी,दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्याच्या उद्देशाने 'हर घर झेंडा' हा उपक्रम 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. या दरम्यान ध्वजसंहितेचे पालन करा, कागदी व प्लास्टिक झेंडे वापरू नका असे  आवाहन प्रशासनाने केले आहे.
.हेही वाचा
SCROLL FOR NEXT