चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी जिल्ह्यासह चंद्रपूर शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने लगतच्या सिनाळा मसाळा नाल्याला पूर आला. त्यामुळे एका गर्भवती महिलेला रूग्णालयात पोहोचताना अडथळा निर्माण झाला. प्रसतीच्या कळा देत असतानाच महिलेला स्ट्रेचरद्वारे कंबरभर पाण्यातून रूग्णलयात सुखरूप पोहोविल्यानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही घटना चंद्रपूर शहरालगतच्या वरवट या गावातून मंगळवारी समोर आली आहे. गोंडस बाळाला जन्म दिलेल्या महिलेचे शुभांगी राहुल लोनबले रा.वरवट असे नाव आहे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्याला मंगळवारी पावसाने झोडपून काढल्यानंतर नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली आले. याच दिवसांतील चोवीस तासात 242 मिमी पाऊस पडल्याची नोंदही हवामान खात्याने केली. धोधो पावसाने शहरातील सर्व रस्त्यावर पाणी येऊन शहरातील गटारे आणि नाले तंडूंब भरून पुराचे स्वरूप प्राप्त झाले. शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. शहराला लागून असलेले नालेही पाहात पाहता फुगले. त्यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करताना अडचण निर्माण झाली. अशीच अडचण चंद्रपूर शहराला लागून असलेल्या वरवठ येथील शुभांगी राहूल लोनबले या गर्भवती महिलेला रूग्णालयात पोहचाना निर्माण झाली. मात्र गावकरी प्रशासकी यंत्रणा धावून आलयाने ती प्रसुतीच्या कळा देतच रूग्णालयात पोहचली. चंद्रपूर तालुक्यातील आणि शहराला लागूनच वरवट हे छोटेसे गाव आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळल्याने सिनाळा मसाळा मार्गावरील पुलावर पुराचे पाणी चढले. त्यामुळे या मार्गाची वाहतूक बंद झाली. जिवाच्या भितीने या मार्गाने जाणे धोकादायक ठरत असल्याने जाणे येणे बंद झाले.
असाच गर्भवती महिला शुभांगी राहुल लोनबोले हिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. गावात प्रसुतीच्या सुविधा नाही. त्यामुळे रुग्णालयात जाणे गरजेचे होते. परंतु बाहेर मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे कुटूंबियांची चिंता वाढली. काय करावे काय नाही काहीही सुचेनासे झाले. मात्र जिवाला धोका होऊ नये प्रसंती करतान यावी याकरीता तिच्या कुटुंबियांनी शुभांगीला ऑटोने चंद्रपूरकडे घेऊन जाण्यास निघाले. ज्या मार्गाने मार्गक्रमण करायचे होते, त्या मसाळा सिनाळा मार्गावरील नाल्याला पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत होते. वाहतूक बंद झाली होती. नाल्यावरून ऑटो टाकले धोकादायक होते. ही घटना गावकऱ्यांना समजता काही गावकरी धावून आले. ग्रा.पं सदस्य विनोद मुनघाटे यांनी सिनाळा गावचे माजी सरपंच बंडू रायपुरे यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली. रायपुरे आणि त्यांचे सहकारी रुग्णावाहीकेसह महिलेला घेण्याकरता पोहोचले.
रुग्णावाहीका एका बाजूला व प्रसुतीच्या कळा देत असलेली गर्भवती महिला दुसऱ्या बाजूला हेाती. वाहन पुराच्या पाण्यातून टाकनेही धोकादायक असल्याने रुग्णावाहीकेतील स्ट्रेचर काढण्यात आले. सोबत कर्मचारी व गावकरी एकत्र झाले. स्ट्रेचरवर महिलेला झोपविण्यात आले. आणि पूरातूनच गावकरी आणि रूग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी कंबरभर पाण्यातून रस्ता काढला. नाल्यावरील पुराच्या पाण्याला पार करून गर्भवती महिलेला रुग्णावाहीकेपर्यंत पोहचविले. तेथून त्या महिलेला रूग्णालयात पोहचविण्यात आले. शुभांगी लोनबले ह्या महिलेला रूग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने तिचेवर उपचार केले. त्या महिलेने एका गोंडस बाळाल जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. पुराच्या पाण्यातून मार्ग काढीत जिवन मरणाचा हा प्रसंग ती महिला आणि गावकऱ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे.