विदर्भ

महाज्योतीच्या १८ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड!

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाज्योतीच्या १८ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या संस्थेमार्फत  महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील पोलीस सेवेत संधी मिळण्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.

महाज्योती मार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. एकूण ५०७ उमेदवारांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत यशस्वी 482 उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. उमेदवारांना प्रतिमाह ६००० विद्यावेतन देण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांमधे जयश्री चव्हाण, पल्लवी चिलगर, राहूल राठोड, रोहिदास खेडेकर, विकास मुंडे, असाराम चौरे, अश्विनी राठोड, अक्षय भोई, हरसिंग जारवाल, प्रताप बोऱ्हाडे, शंकर सुल, सतीश गिरी, सुजाता सोनटक्के, जालिंदर अवघड, सुवर्णा पाटील, योगेश दारूंटे, जगदीश चव्हाण, सुरज जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. व्यवस्थापकीय संचालक महाज्योती राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT