विदर्भ

वर्धा : नदीत वाहून जाणा-या युवकाला जीवदान; दोन तासाच्या प्रयत्नानंतर सुरक्षित सुटका

backup backup
वर्धा: पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे फिरायला आल्यानंतर नदीच्या पात्रात पोहण्यास गेलेला युवक वाहून जावू लागला. युवकाला खडकाचा आधार मिळाल्यानंतर तो उभा राहिला. या युवकाची प्रशासनासह स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित सुटका करण्यात आली. पण, या दोन तासांच्या थरार नाट्यात सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता.
पवनार येथील धाम नदी तिरावर झडशी येथील अनुराग गडकरी नामक युवक मित्रांसह फिरायला आले होते. दरम्यान, अनुरागला पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. पोहताना अनुराग त्या प्रवाहाच्या दिशेने वाहत जात होता. त्याला खडकाचा आधार मिळाला. त्यामुळे तो प्रवाहात उभा राहिला. याची सूचना ग्रामविकास अधिकार्‍यांना मिळताच त्यांनी लगेच सेवाग्राम पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना माहिती दिली. पवनार येथील अर्जून सातघरे, दीपक सातघरे, दशरथ हजारे, भगीरथ जोगे या उत्कृष्ट पोहणार्‍यांना पाचारण केले.
दरम्यान सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे, तहसीलदार कोळपे हे सुद्धा लाईफ जॅकेट आणि आवश्यक बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. लाईफ जॅकेट व दोरखंडाच्या मदतीने आधार देत सुरक्षित तीरावर आणल्याने युवकाचे प्राण वाचले. प्रशासन व स्थानिकांनी तत्परता दाखविल्याने युवकाचे प्राण वाचू शकले. मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी सहारे, ग्राम पंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी यांची याप्रसंगी मदत झाली.
SCROLL FOR NEXT