विदर्भ

भूतकाळातील बलिदान भविष्यातील देशकार्याची प्रेरणा: नितीन गडकरी

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: आपल्या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध असून स्वतंत्रता संग्रामातील थोर देशभक्त, क्रांतिकारक यांच्या कार्यातून आपण बोध घेतला. तर आपल्याला भविष्याच्या देशकार्याची प्रेरणा मिळते. त्यांचे कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व हे आजच्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मंत्री गडकरी यांच्या हस्ते 'आझादी' या संगीतमय लघुपटाचे लाँचिंग करण्यात आले. हा लघुपट एसके म्युझिकवर्क्स कडून 'आझादी का अमृत महोत्सवा'च्या निमित्ताने तयार करण्यात आला आहे. या संगीतमय लघुपटात भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला दर्शविणारे विलक्षण गाणे समाविष्ट करण्यात आले आहे. हे गाणे सिद्धार्थ कश्यप यांनी संगीतबद्ध केले असून संकल्पना देखील त्यांचीच आहे. प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी हे गीत गायले आहे. शकील आझमी यांनी गीत लिहिले आहेत. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अंशुल विजयवर्गीय यांनी केले आहे. 'आझादी' लघुपटाची संपूर्ण टीम या लाँच सोहळ्याला उपस्थित होती. नितीन गडकरी यांच्या हस्ते एव्ही लाँच होण्यापूर्वी या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

स्वातंत्र्यलढ्यातील खऱ्या नायकांना आदरांजली वाहण्याच्या सिद्धार्थ कश्यपच्या अनोख्या संकल्पनेची मंत्री गडकरी यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिद्धार्थ कश्यप म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करायची होती. 'आझादी' साठी संशोधन आणि तांत्रिक तपशील मिळण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले.

गीतकार शकील आझमी म्हणाले की, हे गाणे लिहिणे कठीण होते. कारण त्यात ज्ञात आणि अज्ञात नायकांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्या भावनांचा समावेश आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT