नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माझे संदर्भात काही मीडियावर आलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून ते धमक्या देत आहे. मात्र, मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, मी समाजासाठी लढतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार ,असल्याचं बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
मागील 22 दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मुंबईच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होत 22 मागण्या मान्य झाल्यात. त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी यावेळी जाहीर केले. बैठकीत मिटिंगचे मिनिट्स आणि रेकॉर्डिंग करण्यात आल्याने शंका घेण्याचे कारण नाही. चंद्रपूर मधील उपोषण सोडविण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. राज्यातील इतर शहरातील आंदोलन सुद्धा स्थगित करत आहोत, असे तायवाडे यांनी सांगितले.