भंडारा; पुढारी वृत्तसेवा : कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापेक्षा विहिरीत उडी मारून जीव देईन, असे आपण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला सांगितले होते, असा किस्सा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथील सभेत ऐकविला.
नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या सभेत गडकरी यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी एकदा आपणास कॉँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. आपले काम पाहून जिचकर प्रभावित झाले होते. भाजपचे तुम्ही चांगले कार्यकर्ता आणि नेते आहात. त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी इच्छा जिचकर यांनी व्यक्त केली होती.