Youth Killed in Nagpur
नागपूर : सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल प्राइड समोर एका युवकाचा चार ते पाच अज्ञात तरुणांनी खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. प्रणय ननावरे असे मृत युवकाचे नाव आहे.
पूर्ववैमनस्यातून की इतर कुठल्या वादातून ही हत्या झाली, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. दुपारपर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती सापडले नव्हते. सुरुवातीला पार्टी करीत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हॉटेल बाहेर आल्यावर या वादाने मारहाणीचे स्वरूप घेतले.
परिणामी गंभीर जखमी झाल्याने प्रणय याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या उत्साहाला फारसा प्रतिबंध नको असे सरकारचे मुक्त धोरण आहे. तरुणाईत त्यामुळे आनंद आहे. ख्रिसमस थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन निमित्ताने जल्लोष साजरा करण्याच्या हेतूने मद्य विक्री रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे जसे महसूल वाढीसह चांगले परिणाम आहेत त्याचप्रमाणे काही वाईट परिणामही असल्याचे यानिमित्ताने पुढे येत आहेत.