'त्या' तरुणाची मानसिक तणावात जाळून घेत आत्महत्या  !     File Photo
नागपूर

'त्या' तरुणाची मानसिक तणावात जाळून घेत आत्महत्या  !       

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : छिंदवाडा रोडवरील खापरखेडा परिसरात तरुणाच्या जळत्या मृतदेहाचे गूढ अखेर पोलिसांनी उलगडले आहे. मानसिक तणावातून त्याने आधी दुचाकी पेटवून स्वतः जाळून घेतल्याचे पुढे आले आहे.  शनिवारी (दि.१५) घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ललित सुखाराम वस्त्राने (रा. खापरखेडा) असे मृतकाचे नाव असून त्याला पत्नी,दोन मुले आहेत. ललित हा खापरखेडा वीज केंद्रात डोजर ऑपरेटर होता. दारू पिवून कामावर आल्याने मालकाने त्याला कामावर थांबण्यास नकार दिला. तीन दिवसापासून तो कामावर गेला नव्हता अशी माहिती पुढे आली असून त्याचा पत्नीशीही वाद झाला होता.

आत्महत्येचा विचार त्याने बोलूनही दाखविला होता. शनिवारी सकाळी अभिषेक जगने हा तरुण  नागपूरचे डॉ. मिश्रा यांच्या फार्महाऊसमध्ये नेहमीप्रमाणे कामाला जात असताना त्याला मोटारसायकल आणि एक इसम जळताना दिसला. यांची माहिची पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस आणि आग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. पोलिसांनी एम एच 40 बीए 7895 या मोटारसायकलच्या चेसिस क्रमांकावरून मृतक ललितची माहिती मिळविली.

घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेट्रोल टाकीचे झाकण उघडे असलेली दुचाकी, एक बॅग जप्त केली होती. पोलिसांनी परिसरातील  सीसीटीव्ही तपासले असता ललित हा एकटाच जाताना दिसला. कामाच्या तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT