Heavy Rainfall 
नागपूर

Heavy Rainfall Vidarbha: पुढील तीन दिवस विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, नागपूरला येलो अलर्ट

Maharashtra Weather News: नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मध्यंतरी काही दिवस उघडीप घेतल्यानंतर शहरासह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विभागात गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' आहे. गुरुवारी, ३ सप्टेंबरला अमरावती काही ठिकाणी अतिवृष्टीसह वादळी शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यालाही पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गुरुवारी 'यलो अलर्ट' देण्यात आला असून दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गुरुवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसासह वीज पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांनाही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सावधान नागपूरला 'यलो', गोदियाला 'ऑरेंज' अलर्ट

नागपुरात गेल्यावेळी अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली. दरम्यान, बुधवारी नागपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने अतिवष्टीची शक्यता असल्याने हजेरी लावली. गुरुवारी पुन्हा एकदा येलो अलर्ट आहे. शहरांतील सखल भागात पाणी साचणे, अंडरपास बंद होणे आणि वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोला आणि अमरावती जिल्हयांना 'यलो अलर्ट' वादळी पावसाची शक्यता कायम आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT