World Poha Day | शेफ विष्णू मनोहर यांनी केला  ३,००० किलो ‘तर्री पोहे’ बनविण्याचा विश्वविक्रम! 
नागपूर

World Poha Day | शेफ विष्णू मनोहर यांनी केला  ३,००० किलो ‘तर्री पोहे’ बनविण्याचा विश्वविक्रम!

700 किलो जाड पोहे, 500 किलो चना, 300 किलो आलू, 50 किलो आदरक, लसुन याचा वापर, खवय्यांची गर्दी 

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेल्या आणि देशभरात लोकप्रिय असलेल्या ‘तर्री पोह्यांना’ जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय  शेफ विष्णू मनोहर यांनी आज रविवारी ‘जागतिक पोहे दिना’चे औचित्य साधत ३,००० किलो तर्री पोहे तयार करून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

विष्णुजी की रसोई येथे दुपारपर्यंत मोफत वितरण करण्यात आले. नागपूरची ओळख ऑरेंज सिटी सोबतच खवय्यांसाठी तरी,पोहेसाठी देखील महत्वाची आहे.  विष्णू मनोहर यांनी दोन महाकाय कढईत हे विक्रमी पोहा- तर्री तयार केले. बजाजनगरातील विष्णुजी की रसोई येथे सकाळपासून दुपारपर्यंत खवय्यांनी गर्दी केली.

यासाठी काल रात्रीपासून पूर्वतयारी जोरात होती. साधारणत मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास प्रत्यक्ष ही पाकशाळा सुरू झाली. सुमारे 700 किलो जाड पोहे, 500 किलो चना, 300 किलो आलू, 50 किलो आदरक, लसुन असे साहित्य लागले. माझा आजचा विक्रम नागपूर शहरासाठी, नागपूरकरांसाठी समर्पित होता अशी भूमिका शेफ विष्णू मनोहर यांनी बोलून दाखविली.   

   या नागपूरच्या खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या तर्री पोह्यांमध्ये पारंपरिक कांदा-पोह्यांवर मसालेदार हरभरा किंवा काळ्या वाटाण्यांच्या उसळीपासून तयार केलेली झणझणीत ‘तर्री’,  नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनातील हा आवडता पदार्थ आज शहराची स्वतंत्र ओळख बनला आहे. महाचायतर्फे चहाचे सुद्धा मोफत वितरण झाले. यासंदर्भात माहिती देताना शेफ विष्णू मनोहर म्हणाले की, “इंदोर जसे पोह्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच नागपूर आपल्या खास मसालेदार तर्री पोह्यांमुळे देशभर ओळखले जाते.

लाखो नागपूरकरांच्या दिवसाची सुरुवात आजही तर्री पोह्यांच्या आस्वादाने होते. नागपूरच्या या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. विष्णू मनोहर यांच्या नावावर यापूर्वी अनेक जागतिक विक्रम नोंदले गेले आहेत. त्यामध्ये ८ फूट लांबीचा आणि ४० किलो वजनाचा शाकाहारी कबाब, सलग ५२ तासांची ‘कुकिंग मॅरेथॉन’, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेला भव्य हलवा, कुंभमेळ्यातील हलवा निर्मिती, २५ तासांत १५,७७३ डोसे तयार करण्याचा विक्रम, ५ हजार किलो मिलेट खिचडी, ५,००१ अंड्यांची अंडा भुर्जी तसेच १,१११ किलो रागी (नाचणी) शिरा तयार करण्याचे विक्रम विशेष उल्लेखनीय आहेत. आतापर्यंत ३० हून अधिक जागतिक विक्रम त्यांनी  आपल्या नावावर केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT