नागपूर

Nagpur Election : नागपूर जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी १२२४ मतदान केंद्रांवर मतदान

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका उद्या रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. एकंदर 1224 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

यात काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सावनेर, पारशिवनी, रामटेक, कामठी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देत व्यवस्थेविषयी पाहणी केली.

SCROLL FOR NEXT