आता आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण, सामंजस्य करार pudhari photo
नागपूर

आता आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण, सामंजस्य करार

आता आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण, सामंजस्य करार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'लेंड अ हॅन्ड इंडिया' या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४८७ शासकीय आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सन २०१४-१५ शैक्षणिक वर्षांपासून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यातील १७९ आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ ते १२ वीपर्यंत व्यवसाय शिक्षण घेत आहेत. या सामंजस्य करारामुळे आता इयत्ता ६ ते ८ वीच्या २६ हजार ६७२ विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्यात येणार आहे. त्यात नागपूर अप्पर आयुक्तालयाच्या ३०११६, नाशिक अप्पर आयुक्तालयाच्या ११८२५, ठाणे अप्पर आयुक्तालयाच्या ७९८२ तर अमरावती अप्पर आयुक्तालयाच्या ३८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त संदीप गोलाईत, सहआयुक्त (शिक्षण) संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर. पाटील, अनिल महाजन, संस्थेचे उपसंचालक निलेश पुराडकर, उपव्यस्थापक राजेश्वर गायकवाड, कौशल्य शिक्षण अधिकारी उमेश गटकळ, यूएनडीपीच्या अमृता भालेराव आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात २१३ आश्रमशाळा

व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २१३ शासकीय आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. टप्याटप्याने उर्वरित आश्रमशाळा यात सामावून घेतल्या जाणार आहेत. 'प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता सहावीपासूनच पूर्व व्यावसायिक शिक्षण दिले जाईल.' असे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT