Vijay Wadettiwar Political Criticism  Pudhari
नागपूर

Vijay Wadettiwar | उद्या अन्नासाठी रांगा लावायला लावू नका: विजय वडेट्टीवारांचा सरकारवर संताप

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल, डिझेलसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा

पुढारी वृत्तसेवा

Wadettiwar slams BJP government

नागपूर: राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल, डिझेलसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली, भाजप सरकारला जनतेला रांगेत उभ करायला आवडते. नोटबंदीच्या काळात स्वतःच्या पैशासाठी जनता रांगेत उभी होती. आता पेट्रोल डिझेलसाठी उभी आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रांगेत उभा आहे, सामान्य माणूस कॅन घेऊन डिझेलसाठी फिरतोय आणि सरकार मात्र फक्त जाहिरातींमध्ये व्यस्त आहे आणि प्रिय पंतप्रधान मोदीजी विदेश दौरे करण्यात व्यस्त आहे.

शेवटी नरेंद्र मोदी सरकारच्या अमृतकालात जनतेला मिळाले काय? महागाई, टंचाई आणि रांगा. देश बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी फक्त रांगांचे विषय बदलले. पूर्वी बँकेसमोर रांग होती, आज पेट्रोल पंपासमोर आहे. उद्या अन्नासाठीही सामान्य माणूस उभा करू नका म्हणजे झालं! असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT