नागपूर : नागपूर पाठोपाठ पुणे, मुंबई ,संभाजीनगर असे राज्यभरात श्री नरेंद्र महाराज समर्थकांकडून वडेट्टीवार विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत, माफी मागा अन्यथा परिणामांना तयार रहा, असा इशारा देत निषेध आंदोलन सुरू असताना आणि यात भाजपनेते मंगलप्रभात लोढा यांनीही आक्रमक भूमिका घेतलेली असताना काँग्रेसचे गट नेते विजय वडेट्टीवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
साधुसंतांमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला अशी भूमिका नरेंद्र महाराज यांनी व्यक्त करणे म्हणजे त्यांना कुठले दिव्य स्वप्न पडले का, हा खरं तर महाराष्ट्रातील जनतेचा मतदारांचा अपमान आहे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
खरं म्हणजे संत महंतांनी धार्मिक स्वरूपाचे विधान करीत ध्रुवीकरण करू नये, मुळात समाजात ध्रुवीकरण करणारे साधुसंत नाहीत. सर्व समाजाना एकत्रित घेऊन पुढे जाणे हे संतांचे कर्तव्य आहे अशी रोखठोक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्यानंतर राज्यभरात नरेंद्र महाराज यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.