Vijay Wadettiwar 
नागपूर

देशमुखांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा, यापेक्षा दुर्दैव काय? विजय वडेट्टीवार

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करून न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे, आशिष देशमुखांच्या नेतृत्वात भाजपची ओबीसी जागर यात्रा निघते यापेक्षा दुर्दैव काय? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

इंडिया आघाडीची पहिली सभा नोव्हेंबरमध्ये नागपुरात होण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता इंडियाची बैठक घ्यावी किंवा सभा, अद्याप अंतिम झालेलं नाही. यासंदर्भात महाराष्ट्रातील नेत्यांकडे विचारणा झाली आहे.

काँग्रेस बैठकित राडा झाला याबाबत माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः उपस्थित होते. तो त्यांचा अधिकार आहे, ते कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेतील. मराठा आंदोलनाचे बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा इशारा दिला आहे. आता हा विषय सरकारचा आहे. मराठा, ओबीसी समाजाला न्याय द्यावा. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने करण्याच्या दृष्टीने ठरवावे असेही स्पष्ट केले.

भाजपच्या ओबीसी जागर यात्रेबद्दल छेडले असता वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर या यात्रा निघत आहेत, पण जनता पाच वर्षे काय केले हे विसरत नाही. जनताच योग्य तो निर्णय घेणार आहे. वसतिगृह संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला, मविआ सरकारला लक्ष्य केले. फडणवीस यांना माहित आहे, कोरोना काळात अनेक निर्णय घेतले. आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो. पाच वर्ष भाजपचे सरकार होतं, त्यांनी निर्णय घेतला. पण महाज्योतिची अंमलबजावणी आम्ही केली. चंद्रपूर मध्ये वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याचा विषय मी हाती घेतला होता. दोन वर्ष वसतिगृह बंद होते. केवळ यात्रा काढून होणार नाही. MPSC पास होऊन अनेक विद्यार्थी जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून दिसले असते. पण त्यांना का डावलले, ओबीसीसाठी काय केले? मंत्रालय काढून होत नाही. शेवटी देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपची यात्रा यापेक्षा दुर्दैव काय? असेही वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्यांनी रक्त सांडवले आहे, भ्रमण करून मजा नाही मारली. भाजपने जनतेचा भ्रमनिरास न करता ओबीसीसाठी काय केले? ते सांगावे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT