नागपूर : इंदू मिल येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महामानवांच्या विचारांप्रती सरकारची ही अनास्था असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आखाती युद्धाचे कारण पुढे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम रखडणे दुर्दैवी आहे. देशातील इतर सर्व प्रकल्पांसाठी निधी आणि साहित्य मिळते, मग महामानव डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकालाच विलंब का? नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदतवाढ म्हणजे केवळ सरकारचा वेळकाढूपणा आहे.
केवळ या एकाच प्रकल्पासाठी दिलेले तांबे आणि एलपीजी टंचाईचे कारण पटण्यासारखे नाही. कोट्यवधी अनुयायांच्या भावनांची ही थट्टा आहे. वेळकाढूपणा थांबवा, जनतेची दिशाभूल थांबवा ! असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.