नागपूर

आम्हीही ओबीसींच्या मोठ्या सभेची तयारी करीत आहोत : विजय वडेट्टीवार

दिनेश चोरगे

नागपूर;  पुढारी वृत्तसेवा : मराठा समाज शक्तिप्रदर्शन करत असेल तर आम्हालाही ओबीसी संघटनांची मोठी सभा घ्यावी लागेल. त्याची आम्ही तयारी सुरू केली आहे, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जरांगे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, सभेसाठी विशेष कृती समिती आम्ही स्थापन केली आहे. आम्ही साडेतीनशे जातींचा ओबीसी समाज आहोत हे कोणीही विसरू नये. सध्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अद़ृश्य शक्ती पाठिंबा देत असल्याचे दिसून येते. पुढील महिन्यात संविधान दिनाचे औचित्य साधून आम्ही नागपुरात भव्य सभा घेण्याची तयारी करीत आहोत.

ते म्हणाले, जरांगे-पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, आरक्षण जाहीर करता येणार नाही. त्यांनी सरकारला दहा दिवसांची मुदत दिली असली, तरी अशी मुदत घालून आरक्षण देता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली जातील. त्यामुळे या विषयावर ठोस भूमिका घेण्याची सरकारची जबाबदारी आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी आमची मागणी आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असते. महायुतीत ते शक्य नाही. भाजप त्यांचा केवळ वापर करून घेत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT