Canva Image
नागपूर

Vidarbha Weather News | 14 जूनपर्यंत विदर्भ तापलेलाच, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको!

कृषी विभागाने वर्तवला अंदाज | तापमानही ४५ डिग्रीपर्यंत जाण्याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे संथ गतीने, रखडला आहे याशिवाय किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात 45 अंश पर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.

14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेल, ही शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT