Uma Bharti Private Secretary Statement
नागपूर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची प्रकृती ठणठणीत असून त्या नागपुरात कोणत्याही हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या नाही किंवा भरती केलेले नाही, असे त्यांचे खासगी सचिव विष्णुगुप्त श्रीनिवास वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.
उमा भारती शुक्रवारी (दि.२) पांढुर्णा येथे मुक्कामी आहेत. नागपूर येथे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांच्या घरी उमा भारती यांनी भेट देऊन सुनंदा वैद्य यांच्यासोबत भेट घेतली. उमा भारती याचा शनिवारी (दि. ३) वाढदिवस आहे. त्यानिमित त्या आज जाम सावली हनुमान मंदिरात भेट देऊन दर्शन घेणार आहेत. यानंतर त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भोपाळला जातील. पहलगाम येथील घटनेमुळे त्यांनी आपले वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले आहेत, असेही त्यांच्या खासगी सचिवांनी कळविले आहे.