Leopard Skin Seized
नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे कारवाई करत दोन बिबट्यांची कातडी आणि एक हस्तिदंत जप्त केले.
गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या नागपूर युनिटने उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेत ही कारवाई केली. जप्त केलेल्या वस्तू आणि त्या व्यक्तींना वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत पुढील तपासासाठी उज्जैनच्या जिल्हा वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. यापूर्वी देखील जानेवारी 2025 मध्ये डीआरआय नागपूर युनिटने अकोला येथे बिबट्याची कातडी जप्त करीत तीन व्यक्तींना अटक केली.