Uddhav Thackeray | चोरांच्या की रामभक्तांच्या : कुणाच्या बाजूने ते स्पष्ट करा, उद्धव ठाकरेंचे संघ-भाजपला आव्हान 
नागपूर

Uddhav Thackeray | चोरांच्या की रामभक्तांच्या : कुणाच्या बाजूने ते स्पष्ट करा, उद्धव ठाकरेंचे संघ-भाजपला आव्हान

देशव्यापी आंदोलनाची घोषणा, रामरक्षा पठण कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - एकदा तुम्ही रामभक्तांच्या बाजूला आहात की, राम मंदिर दानपेटी चोरांच्या बाजूने आहात हे स्पष्ट करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करीत संघ परिवार आणि भाजपला आज शनिवारी लक्ष्य केले. रामरक्षणाचा हा देशव्यापी लढा आजपासून सुरू करीत असल्याचे जाहीर केले. शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज शनिवारी उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे यांचे रामरक्षा पठण आणि महाआरती रामनगर येथील राम मंदिरात आयोजित करण्यात आली होती त्‍यांनतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी सोबत पूजेला एकही शंकराचार्य नव्हते.आता देशातील प्रत्येक हिंदूने न्यायनिवाडा केला पाहिजे. अब हिंदू माफ नही करेगा .... लोकवर्गणीतून मंदिर उभे झाले. पक्ष बाजूला ठेवा,आपल्याला शांततापूर्ण मार्गाने हा लढा द्यायचा आहे. अजून कर्जमाफीचे काही खरे नाही. राज्यात 92 लाख लाडकी बहीण वगळल्या, साडी योजना बंद केली असाही आरोप केला.

विदर्भाने पाठिंबा काढला की भाजप सत्तेतून दूर गेल्याशिवाय राहणार नाही असा टोला लगावला. हिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुखांनी खऱ्या अर्थाने हिंदू जागृत,एकजूट केला. अयोध्या आंदोलनाला तेज प्राप्त करून दिले. भाजपप्रमाणे मनी नाही भाव,देवा मला पाव...असे आमचे हिंदुत्व नाही. पेपर,पक्ष तर फोडले जातात आता मंदिरातल्या तिजोऱ्याही फोडल्या जात आहेत. ही कुणाच्या बापाची जागीर नाही.

राम मंदिर भाजपचे पैसे गोळा करणारे हे एटीएम झाल्याचे साधू बोलताहेत. यातूनच आमदार खरेदी झाली असे मी म्हणत नाही लोक बोलत आहेत. कुठले असे क्षेत्र जिथे भ्रष्टाचार नाही. काँट्रक्टर अभय देणारे काय कामाचे ? आम्ही कार्यक्रमासाठी सर्वांना आवाहन केले. एकही भाजपावाला आला नाही. काँग्रेसचे खासदार श्याम बर्वे, सुनील केदार,सलील देशमुख आले याविषयी आवर्जून उल्लेख केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT