नागपूर : येथील आयसी चौकातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात मंगळवारी रात्री दोन युवकांनी घुसून इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तिने आरडाओरड केली असता, तिचा मोबाईल हिसकाऊन ते पसार झाले. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या गावातच मुली सुरक्षित नसल्याचा आरोप केला.
सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत. घडलेला गंभीर प्रकार वार्डनला सांगितल्यावरही वार्डन व संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप केला जात असून, पोलिसांना याबाबत माहिती दिली असता, एमआयडीसी पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही. साधी चौकशी सुरू केली नाही. आरोपींना शोधण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न केला नाही. एकंदरीत वसतिगृह प्रशासन व पोलिस प्रशासन या दोन्हींनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असे दिसत आहे, असे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.