नागपुरात आदिवासी समाज बांधव आक्रमक, जेलभरो आंदोलन  File Photo
नागपूर

नागपुरात आदिवासी समाज बांधव आक्रमक, जेलभरो आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

एसटीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी विदर्भासह राज्यभरातून हजारो आदिवासी समाज बांधव आज (शुक्रवार) नागपुरात धडकले. जेलभरो आंदोलन इशाऱ्यानंतर पोलीस आंदोलकांमध्ये झटापट सुरू झाली. यामुळे या ठिकाणी वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

गेले काही दिवस यशवंत स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या उपोषण, आंदोलनाच्या समर्थनात आज मोर्चाची हाक दिल्यामुळे हे आदिवासी बांधव शेकडो वाहनांनी नागपुरात दाखल झाले. दुपारी यामुळे यशवंत स्टेडियम सीताबर्डी परिसरात जागोजागी वाहतूक खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.

400 च्या वर पोलिसांचा तगडा बंदोबस्त उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात घटनास्थळी आज सकाळपासून लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी आदिवासी बांधवांच्या सीताबर्डी परिसरातील ठिय्या आंदोलनाने रात्री उशिरापर्यंत नागपुरात चक्काजाम परिस्थिती उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर आज पोलीस व वाहतूक पोलीस विभागाने पुरेशी खबरदारी घेतली. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हजारो आदिवासी समाज बांधव जेलभरो आंदोलन करतील असा इशारा देण्यात आल्याने वातावरण तापले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT